आमच्या सेवा

मोबाईल बँकिंग

इंटरनेट ने जगात प्रवेश केल्यापासून बँकिंग उद्योगात मोठा बदल झाला आहे. इंटरनेट इतके लोकप्रिय नसण्यापूर्वी बँकिंग व्यवहार करण्यासाठी, लोकांना बँकेत जावे लागायचे, लांब रांगेत उभे राहत आणि नंतर त्यांच्या नंबर ची वाट पाहावी लागायची. मग जरी लोकांना फक्त त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घ्यायची असेल , रोख रक्कम काढायची असेल किंवा पैसे हस्तांतरित करायचे असेल तरीही थेट बँक गाठावी लागायची. परंतु आता त्यांना विविध प्रकारचे बँकिंग व्यवहार करण्यासाठी बँकेला भेट देण्याची गरज नाही कारण ते मोबाईल बँकिंग सुविधा वापरू शकतात.

संत तुकाराम मल्टीस्टेट

  यु पी आय क्यू आर कोड

  गेल्या काही काळात ऑनलाइन पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एखादी व्यक्ती खरेदी करते किंवा एखाद्याला पैसे ट्रान्सफर करते तेव्हा QR कोड स्कॅन करावा लागतो. OR Code द्वारे पैसे भरणे खूप सोपे होते. केवळ पेमेंटसाठीच नाही तर कोणत्याही पॅकेटवर क्यूआर कोड देखील दिसतो. जो खूप महत्त्वाचा असतो. QR कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड आहे. हे खूप जलद काम करत असून हे सर्व एका बॉक्समध्ये घडते. या बॉक्समध्ये url आणि मोबाईल नंबर लपवलेला असतो. अशात, तुम्ही कोड स्कॅन करताच, तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत त्याची माहिती तुम्हाला मिळते.संत तुकाराम क्यूआर कोड सुविधा

  संत तुकाराम मल्टीस्टेट

   चेक क्लिअरिंग

   चेक बँकेत जमा केल्यानंतर तो वटण्यासाठी तीन दिवस वाट पाहण्याची गरज नाही. आता काही तासांतच चेक वटणार असल्याने तुमच्या खात्यात जमा झालेली रक्कम तुम्हाला काढता येणार आहे.मात्र ऑनलाइन पद्धतीने बँकेतील चेक खात्यात वळते करण्यात येणार असल्याने चेक वटण्याचा हा कालावधी कमी होणार आहे. एक्स्प्रेस चेक क्लिअरन्सप्रमाणे प्रत्येक चेक आता डिजिटल किंवा ऑनलाईन क्लिअर होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही चेकचे पैसे काही तासांतच तुमच्या खात्यात जमा होणार आहेत

   संत तुकाराम मल्टीस्टेट

    आरटीजीएस आय एम पी एस

    बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याकरता आरटीजीएस  वापरतात . ते तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीच्या दुसऱ्या बँकेमध्ये पैसे पाठवायचे असल्यास आरटीजीएस करू शकता. बँकेमधून किंवा ऑनलाइन पद्धतीने सुद्धा आरटीजीएस करता येते. तुम्ही दोन लाखाच्या पेक्षा जास्त पैसे पाठवू शकता  . त्यासाठी तुम्हाला ज्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीचा अकाउंट नंबर, त्याचे नाव व त्याची शाखेचे नाव ,त्याच्या बँकेचे नाव तसेच आयएफसी कोड ह्या गोष्टी असतील तर तुम्ही करू शकता .आरटीजीएस करण्यासाठी तुम्हाला काही शुल्क असतो तो बँकेला द्यावा लागतो . आरटीजीएस  पैसे पाठवण्याची मार्ग आहेत 

    संत तुकाराम मल्टीस्टेट

     कर्जावरील कमी व्याजदर

     आजच्या काळात प्रत्येकाला कर्जाची गरज आहे. जर तुमच्याकडे पैसे नसतील आणि तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल, तर त्यासाठी बँकेचे कर्ज घेणे हा एक सोयीस्कर पर्याय आहे. याशिवाय, आर्थिक संकटातही बँकेचे कर्ज आपले जीवन खूप सोपे करते. तुम्हाला कर्ज देणारी वित्तीय संस्था तुमच्या कर्जावर व्याजदर कसा आकारते हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का. त्यामागे कर्जाची निकड, कर्ज परतफेडीची वेळ आणि व्याजदर इ.ची भूमिका आहे.

     संत तुकाराम मल्टीस्टेट

      about us

      ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचवावे गावांमध्ये आर्थिक सुबत्ता यावी येथील बेरोजगार तरुणांना नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात महिला शेतकरी व्यापारी स्वावलंबी व्हावे म्हणून संत तुकाराम मल्टीस्टेट ची सर्व टीम काम करत आहे. 

      about us

      ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचवावे गावांमध्ये आर्थिक सुबत्ता यावी येथील बेरोजगार तरुणांना नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात महिला शेतकरी व्यापारी स्वावलंबी व्हावे म्हणून संत तुकाराम मल्टीस्टेट ची सर्व टीम काम करत आहे. 

      © 2023 –  All rights reserved.Design & Developed by Premixmedia